“हजारों कोटींचे असत्य प्रयोग!”

‘असत्याचे प्रयोग’

सिद्धांत सिस्कॅान ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी माझी बायको सुप्रिया राजू परुळेकर आणि तिच्या दोन मैत्रिणी वर्षा राऊत आणि माधुरी राऊत यांनी 2007 साली स्थापन करायचे माझ्या घरात ठरवले. ती कंपनी तेव्हा रजिस्टर झाली नि एका पै चा कोणताही व्यवहार वा बॅंक अकाउंट न निर्माण करता पुढे गेलीच नाही. पुढे काहीच न झाल्याने ती कगदावर उत्साहाने रजिस्टर झलेली कंपनी सरकार दरबारी अपोआप बार झाली. हे सारं पब्लिक डोमेनमध्ये ऊपलब्ध आहे.

माझ्या बायकोने (सुप्रियाने)2008 पासून पूर्ण वेळ English fiction लिहायला सुरुवात केली ती आजतगायत. 2008 नंतर संजय नि मी वगळता सुप्रिया, वर्षा वाहिनी नि माधुरी वाहिनी यांचे संबंध तितकेच ऊत्तम असुनही साधी भेट ही झालेली नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्याची लढाई लढत दूर गेल्या. (मनाने नव्हे).

वर्षा राऊत या माझे मित्र खासदार संजय राऊत यांच्या पत्नी. माधुरी या त्यांच्या नि आमच्या कौटुंबिक स्नेही. आमच्या मुली त्या काळात एकत्रच वाढल्या.

2007 नंतर आज तेरा वर्षानंतर माझ्या घराचा पत्ता नि माझ्या बायकोचे नाव (जीला आयुष्यात चांगली पुस्तके लिहुनही चांगले पैसे कधी मिळाले नाहीत.) भाजपाच्या किरीट सोमय्या आणि आय टी सेलच्या हैवानांनी पीएमसी बॅंकेपासून ते एचडिआयएल च्या हजारो कोटीच्या भ्रष्टाचारात ट्वीटरवर पत्त्यासहीत प्रसिद्ध करुन टाकले. तेव्हा उत्साहात त्या तिघींनी अशी कंपनी तेव्हा जन्म घालून सोडुन दिल्याचे आम्हाला आठवले.

वर उल्लेख केलेली कंपनी स्थापन होऊन चालूही होऊही शकली नाही. मात्र एबीपीचे हिंदीचे मित्र पत्रकार माझी ‘भ्रष्टाचारी’ बायको काय म्हणते ते ऐकायला माझ्या पत्यावर येऊनही गेले. तिथे लॉकडाऊनपासून आम्ही तिथे गेलेलो नहिए.
आत्ता मी एका Family emergency साठी परदेशात आहे.
मी कधीही इतरांच्या कुटुंबियांवर खोटे आरोप केले नाहीत. किरीट सोमैय्या यांच्या मुलाबाबतच्या खोट्या बातमीबद्दल मी आधी निषेध केलेला होता. असो.
ते असेच धादांत खोटया कंडया पिकवत राहोत नि निरपराध असेच जळत राहोत. कधी तरी त्यांचीही पाळी येईलच.
तेव्हा आशा आहे ते मेधा वाहिनी किंवा नील यांची नावे पुढे करणार नाहीत.
रियाचे रक्त आधीच त्यांच्या ओठाना लागलेले आहे.
भारतात मी 15 जानेवारीला परतेन तेव्हा माझ्या मुलीच्या नि बायकोच्या नाहक बदनामी व मनस्तापावर क़ायदा, संविधान व मनुस्मृती काय म्हणते ते पाहीन.
बाक़ी मी माझा देश असलेल्या नव्या भारताचा आभारी आहे.