तरुणांच्या अहिंसात्मक क्रांतीची सुरुवात …गेल्या काही महिन्यात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली तथाकथित ‘टीम अण्णा’ असे ज्याला म्हणतात त्या ‘Gang केजरीवाल’ यांनी स्वत: सर्व मर्यादा पार करून स्वत:ला न्यायलय नि संसदे पेक्षाही श्रेष्ठ घोषित केलेलं आहे. देशातील सर्वांनाच भ्रष्टाचार नको आहे. सशक्त लोकपाल बिल ही हवे आहे. परंतु या सर्वांमध्ये लोकशाही व पारदर्शकताही त्यांना हवी आहे.

स्वत: केजरीवाल, किरण बेदी, मनिष सिसोदिया हे सकृतदर्शनी सिध्द असणाऱ्या अनेक घोटाळ्यात अडकले आहेत. अण्णांना पुढे करून त्यांनी कोट्यावधी रुपये गोळा केलेले आहेत. आजही गोळा करत आहेत. प्रशांत भूषण हे तर धडधडीत देशद्रोही वक्तव्ये करत मोकळे फिरत आहेत. कीरण बेदींवर अनेक आरोप व एफ.आय.आर दाखल होऊनही त्यंना अटक झालेली नाही. उलट सरकार स्वयंघोषित ‘टीम अण्णा’ चीच तळी उचलून धरत आहे.

सरकार यात पाच ज्ञात व उरलेल्या पंधरा एक जणांना कोणताही जनाधार नसताना त्यांची नियुक्तीच जणू लोकांनी केलेली आहे किंवा संवैधानिक आहे अशा प्रकारे त्यांच्या मागून धावत त्यंना सरकारी दर्जा बहाल करत आहे. देशांतील सर्व जनतेच्या नि युवकांच्या भविष्याचा फैसला करण्याचा अधिकार या Gangशी हातमिळवणी करून जनतेचा आक्रोश आणि राग कमी करण्यासाठीया Gangला कुकरच्या शिट्टी प्रमाणे वापरत आहे. त्याच्या बदल्यात केजरीवाल-सिसोदिया यांचे आर्थिक व्यवहारांची चौकशी होत नाही. किरण बेदींना एफ.आय.आर होऊनही अटक होत नाही. देशद्रोही वक्तव्य आणि सी.डी कांड या सर्वात सापडूनही भूषण पिता-पुत्रांना सरकार हात लावत नाही. या विरुध्द देशातल्या सर्वच राज्यांतून असंख्य युवकांमध्ये प्रचंड चीड आणि आक्रोश आहे. त्यांना थेट सरकारशी भिडायचे आहे. देशभरातल्या धुरीणांशी व युवकांशी चर्चा करून मी व माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या वतीने महाआंदोलन सुरु करण्याचे ठरविले आहे. ते लोकशाही मार्गाचे असेल व त्यात देशभरातल्या सर्वांना समान संधी असेल. सरकार आणि लोकं यांच्या मध्ये येणाऱ्या या केजरीवाल Gangला सरकारने ताबडतोब त्यांच्या वरील आरोपांच्या चौकशीसाठी ताब्यात घ्यावे नि जनतेच्या उग्र संतापाला थेट सामोरे जावे ही आमची पहिली मागणी आहे. केवळ लोकपालच नव्हे तर भ्रष्टाचार, काळा पैसा, tax system reformation, अर्थनीतीत व जुन्या कायद्यात बदल, सुव्यवस्थेसाठी निर्णायक पावले उचलणे वगैरे अनेक मागण्या आहेत. शिक्षण, आरोग्य, काळा पैसा याबद्दल सरकारला लोकशाही पद्धतीने उत्तर द्यावे लागेल. टीम केज्रीवालच्या मागे सरकार फार काळ लपू शकणार नाही. सुरवातीला माझे सहकारी ९, १०, ११, १२ डिसेम्बर २०११ला (खुद्द अण्णां समोरही) धरण धरणार आहेत. २३ डिसेंबरला हा संघर्ष सरकार आणि ‘Gang अण्णा’ या दोन्ही मोर्च्यांवर लढला जाईल. दिल्लीच्या रस्त्यारस्त्यावर हा संघर्ष होईल. प्रत्येक आंदोलनात मी व्यक्तिश: उपस्थित नसेन किंवा असेन. माझ्या देशातल्या सर्व युवक-युवतींना सलाम!

ज्या व्यक्तींना व संघटनांना यात सामील व्हायचे आहे व पुढे देशभरातल्या अनेक शहरांमध्ये होणाऱ्या उग्र संघर्षाचा व निर्णय प्रक्रियेचा भाग व्हायचे आहे त्यांनी rajuparulekar@hotmail.com  वर कृपया संपर्क साधावा.

११ तारखेला जंतरमंतरवर भेटुच!

इन्किलाब जिंदाबाद! जय हिंद!

राजू परुळेकर

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s