सिनेमा असा नसतो राजा…


नटसम्राट हा चित्रपट ज्या नाटकावर बेतलाय ते नाटक ऑपेरा नव्हे. त्यातले काव्यमय संवाद हे ऐकायला जरी बरे वाटले तरी ते नाटकाला कृतक बनवतात. असं कुणी वास्तवात बोलत नाही.
भारतीय रंगभूमिवर जी क्रांति विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, मोहन राकेश, बादल सरकार, सत्यदेव दुबे, सतीश आळेकर व या सारख्या दिग्गजानी आणली त्यात हे नाटक येत नाही. या नाटकाचा बाज पारंपारिक मराठी नाटकाचा आहे.वि.वा.शिरवाडकर हे महाकवि होते. महान नाटककार नव्हे. त्यामुळे नटसम्राट नाटकातले संवाद अवास्तविक,पल्लेदार नि सत्य आयुष्याशी सम्बन्ध तुटलेले आहेत. 1972 च्या सुमारास हे नाटक खुप गाजलं. शिरवाडकरानि गाजलेल्या ऐतिहासिक शोकांतिका घेऊन कौंतेय(कर्ण), वीज म्हणाली धरतीला (झाशीची राणी लक्ष्मीबाई) अशी नाटकं लिहिलित. त्यांच्या नावावर अनेक एकांकिका व नाटकं आहेत पण ते आधुनिक रंगभूमिचे एक जनक नव्हते. ते जुन्या पठडितले, नाटक व आयुष्य यांच्यात विभाजन मानणाऱ्या, नाटककारांपैकी एक होते. त्यामुळे त्यांच्या नाटकाच्या सामर्थ्यात त्याची मर्यादा दडलेली असे. ती म्हणजे, अतिवादी मेलोड्रामा,भाषेच्या चांदण्या-चंद्र, प्रेक्षकांच्या डोळ्यातुन अश्रु काढणे हीच संवादाची सार्थकता, शोकांतिकेचि उदात्तता,अभिनेत्याच्या अभिनयातील साऱ्या कलकुसरीला बटबटित संधी वैगरे वैगरे…
नटसम्राट हे नाटक शेक्सपीअरच्या किंग लिअरवर आधारलेले असले तरी याचा नायक गणपतराव बेलवलकर हा लेखकाने स्वयंभू निर्मिलेला आहे. मराठीत ठळक असे तीन महानायक शोकात्म अस्ताला गेले. स्व.दिनानाथ मंगेशकर, स्व. बालगंधर्व, स्व. मा. भगवानदादा. त्यांची शोकांतिका झाली व सूर्यास्त झाला म्हणुन महाराष्ट्र तेव्हा तेव्हा रडला नाही!
तर असे नाटक व अशी त्याची कथा घेऊन 2016 मध्ये मराठी चित्रपट आला.
मुळात हा चित्रपट,अतिवादी मेलोड्रामा,भाषेच्या चांदण्या-चंद्र, प्रेक्षकांच्या डोळ्यातुन अश्रु काढणे हीच संवादाची सार्थकता, शोकांतिकेचि उदात्तता,अभिनेत्याच्या अभिनयातील साऱ्या कलकुसरीला बटबटित संधी,वैगरे वैगरे गणितं घेऊनच आला. त्यात काळाला समांतर जाणारी शोकांतिका नव्हतीच. मराठी समाज पराभूत मानसिकतेत जगतो. आपला काल्पनिक सुवर्णमयी भूतकाळ अश्या प्रेक्षकाला आवडतो. रोजच्या आयुष्यातले संघर्ष रडु न देता रट्टे घालत असतात. अश्यावेळी निर्माते दिग्दर्शक नटसम्राटचा जुना “सुवर्णकाळ” नव्या नटात घालून आणतात.
सर्वांचा हिशेब चोख पक्का असतो.
1.नव्या नटसम्राटाला “अभिनयाची” सारी कलाकुसर करण्याची हौस भागवता येते.
2.प्रेक्षकाला फेक नॉस्टॅल्गिया व वर्तमानातल्या पराभवावर प्रतिष्ठेने भरपुर रडता येते.
3.दिग्दर्शकाला अगदी थोड्या नव्या जागा व काही नवी पात्रे फक्त भरायची असतात.बाकी सारे प्रेक्षकाच्या मनातही तयार असते!
4.निर्मात्यांसाठी “तयार” ग्राहक व बाजारपेठ असतेच.
यात शिवधनुष्य कसले? व कोणी पेलले? सिनेमा असा नसतो राजा….
आपण सिनेमा जगतोय नि आयुष्य पहतोय असं प्रेक्षकाला वाटायला लावतो तो सिनेमा
त्या अर्थाने नटसम्राट 2016 हा चित्रपट, एक नाटकं भरलेली नाटुकलि आहे…
सिनेमा असा नसतोच राजा…

खरा सिनेमा करणाऱ्यानी मग काय डोळ्याच्या खाचेत शेण घालून सिनेमे बनवले होय रे!

नटसम्राट 2016 हे एक खात्रीलायक यशस्वी पॅकेज नि प्रॉडक्ट आहे.
ते बनवायलाही खुप श्रम व पैसे लागतात त्याचा आपण आदर करू शकतो…
पण सिनेमा असा नसतो राजा….

राजू परुळेकर
raju.parulekar@gmail.com
+91 9820124419

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

5 Responses to सिनेमा असा नसतो राजा…

 1. Kedar says:

  Wwaa Chaan… Agdi patley. Mala tar trailer itka natki vatla ki pic baghayche dhadas nahee karu shakat.

 2. अंबर says:

  पटण्यासारखेच आहे . उगाचच खुप भारावून जाण्याची गरज मलाही नाही वाटली

 3. Suresh says:

  What you expressed is quite right. Even when a lot of ad campaign was going earlier to release, I also thought about on similar lines. You put it nicely into words.

 4. Nivedita Raje says:

  हे असे प्रश्न पडतात मग राजुसर ,, म्हणुन अश्या गाजलेल्या व्यक्ति आणि कलाकृतींवर बेतलेल्या ‘शिन्मा’ला जाण्यापूर्वी तात्पुरता ‘ ब्रेन-वॉश’ करून जावं _____तिकिटाचे पैसे वसूल होतात

 5. Ajit Bhide says:

  Delighted to read this review. It reached me through a facebook group I belong to. I am not sure I agree with your analysis of Kusumagraj and his merits as a playwright, but this Natasamrat was a huge disappointment: Seedy script, poor casting ( Agashe or Gokhale or EVEN Manjrekar himself would have suited the role better).
  Have been a fan of your interviews on e-Marathi channel and miss those now!
  Keep it coming!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s