पाप


“सुट्टीत कुठेतरी ब्रेक म्हणुन जायला हवं”
हे वाक्य सदासर्वकाळ बोललं जातं अलीकडे…
कसली सुट्टी? कुणाला ब्रेक? कुठला?

जिथुन निघालात तिथेच परत यायचय नि तेच करायचय तर त्या सुट्टीला पॅरोल म्हणतात….

तर संन्यासी सुद्धा मठात येतात परत नि मग मायेचं मिथ्यापण समजावत बसतात वर्षानुवर्ष…
भागवत कथा सप्ताह करुन…

सगळे कैदी तुरुंगपलिकडल्या भिंती पलिकडे जो “स्वर्ग” आहे त्याची वर्णनं एकमेकांना सांगतात….

जे आपलं कधी होणारच नाही त्याचे फोटो शेयर करतात…
पर्वत,नद्या, सूर्य,चंद्र, तारे, नागड्या सुंदर स्त्रीया अन् नागडे सुंदर पुरुषही…

मग स्वत:ला आनंदित करतात…
जसे मठातले संन्यासी कृष्णजन्माची गोष्ट सांगताना स्वत:च्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहवतात…

खरंतर कुणीच कुठेच जात नाही…
बाथरूमच्या आत फक्त सगळे खरे असतात…

बाहेर आल्यावर आपला DP बदलत राहतात…
मग पुन्हा फोटो नि कहाण्या शेयर करतात…
प्रत्येक पहिल्याला दुसऱ्याच्या हेवा वाटतो
प्रत्येक दुसरा “देवाकडे” स्वत:साठी पहिल्यासारखं
जगणं मागतो…

खरंतर कुणीच पहिला वा दुसरा नसतो…

बाथरूमच्या आत कृष्णजन्माच्या कहाण्यातले अश्रु नि नागड्या स्त्रिया नि नागड्या पुरुषांची चित्रं खरी होऊन एकामेकात मिसळतात…

परत बाहेर येण्याच्या कल्पनेने मग “पॅकेजमध्ये” घेतलेल्या हिमालयावरुन
काही अश्रु मग ओघळत खाली येतात…
मठात घंटा नित्यनेमाने वाजत राहतात…

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to पाप

  1. Sunila says:

    Excellent. ….exactly what I felt and you wrote it in realistic, true words….today everyone wants to go to a place to take photos and “share” ( read as ‘make jealous’ ) and show them to the world. …visiting two three places around the world just proves that only the language changes because of boundaries in the minds. …rest all is exactly as it should be on Planet Earth.

  2. Kalyani Deshpande says:

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s