सैराटच्या निमित्ताने


परशा पहिला नव्हे. पाटिल सुद्धा पाहिले नव्हे. किंबहुना हे ते नव्हेच!

हे मी सैराट या चित्रपटाचं समीक्षण लिहित नाहिये. मला व्यक्तश: नागराज मंजुळे आवडतात.

किंबहुना प्रत्येक मराठी माणसाला खुप पैसे मिळावे असं मला वाटतं. मराठी माणसाने लढावं नि माझ्या खानदानाला पैसे मिळावे असं मला वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही मराठी चित्रपटाबद्दल,कलेबद्दल काही मुद्दे असतील तर मी ते गल्ल्याचं काम फत्ते झालं की मांडतो.

‘सैराट’ हा काळानंतर आलेला Cliche मसाला सिनेमा आहे.

माझं हे त्यावरचं लेखन मी कला,कलाजीवन व त्यातील जीवनवाद इतपत मी मर्यादित करून घेतलय.

तर परशा पहिला नव्हे.किंबहुना तो “तो” नव्हेच ज्यासाठी बाजूचे व विरोधी भांडत आहेत.

पाहिला ‘सामना’ चित्रपटातला मारुती कांबळे! 1974 मध्ये हिंदुराव पाटिल याला मास्तर विचारतो, “मारुती कांबळेचं काय झालं?” मारुती कांबळे हा दलित रिटायर्ड जवान हिंदुराव पाटलाच्या सरंजामी साम्राज्याला आव्हान देतो. त्याचा काटा काढला जातो. तो चित्रपटात दिसत नाही पण अख्हा चित्रपट त्याच्या भासाने आणि क्रूर गायब होण्याने भरून राहतो. मारुती कांबळेचं चित्रपटात नसणं हे एका बलाढ्य संघर्षाचं प्रतिक बनते.
हिंदुराव पाटलाने त्याचा खून केला हे कळत राहातं. ते शेवटी जीवघेणं अंगावर येतं…या चित्रपटाला चित्रपटाची नवीन भाषा आहे….अगदी बॉडी लैंग्वेज पासुन.मराठी चित्रपटात हां जातीयतेचा अमानुष अविष्कार प्रथम आला.मराठी प्रेक्षकाला तो कळलाच नाही. तेव्हा झी सिनेमा नसल्याने मार्केटिंग हे एका निर्मात्यावर पडे 1974 साली आलेला चित्रपट सामना चालला नाही.पुढे एका जर्मन शिष्टमण्डळाला तो प्रचंड भावला. त्यामुळे तो बर्लिन फ़िल्म फेस्टिवलसाठी निवडला गेला. तेव्हा फेस्टिवल रोज होत नसत! त्यामुळे मराठीत खळबळ झाली..हळुहळु तोंडी-लेखी पसरत जाऊन 1975 साली हा चित्रपट पुन्हा थिएटर मध्ये लागला. तेव्हा लोक तो पाहु लागले

दुसरा ‘कोर्ट’ हा चित्रपट मागच्या वर्षीच आला. त्यात एक निष्पाप सफाई कामगार जो गटारीच्या भोकात जाऊन तिथल्या विषारी वायुनी आधी एक डोळा गमावतो नंतर जीव गमावतो…तो मागासवर्गीय आहे, नायक आहे, चित्रपटात दिसत नाही. त्याचं नसणं जीवघेणं अंगावर येतं. या चित्रपटाचा दुसरा नायक न वाकणारा आंबेडकरी चळवाळीतील शाहिर आहे. बलाढ्य व जातीय व्यवस्था त्यालाही निष्पाप असताना मोडुन काढू पहाते… हे सांगण्याची वेगळी ब्लॅक हयुमर व छाया प्रकाशाची सिनेमाची भाषा लेखक व दिग्दर्शकाने निवडलीय…

विषारी जातीयता नि व्यवस्था नि समाज यांची काहीही करुन दुर्बलाना चिरडण्याची राक्षसी आकांक्षा याचे भीषण वास्तव श्वास बंद करते. हा ही चित्रपटही काही धो धो चालला नाही. उच्चवर्णीय व मध्यमवर्गाने या दलित शोषितांच्या आवाजावर जवळपास बहिष्कारच टाकला.

1974 साली ‘सामना’ हा चित्रपट रामदास फुटाणे व 2014 साली ‘कोर्ट’ चित्रपट हा विवेक गोम्बर या एकांडया निर्मात्यानी कला व जीवनवाद यांच्या मिश्रणातुन निर्माण केले.

त्यातल्या लेखक व दिग्दर्शकामागे अजस्र पैसे मार्केटिंग लावणारी संस्था नव्हती. हे चित्रपट त्यांच्या काळाच्या पुढे होते. अश्या कथानकांवर व प्रयोगांवर या कंपन्या पैसे लावत नाहीत….

झी सिनेमा ही एक कॉर्पोरेट कंपनी आहे. त्यानी अनेक नव्या जुन्या व गाजलेल्या नाटक व सिनेमांचे हक्क विकत घेतलेले आहेत. प्रॉडक्ट मार्केटसाठी अनुकूल बनविणे व नवीन would be ग्राहक शोधणे हे काम ते करतात. या मसाल्यात “प्रयोग” हे फोडणीसारखे करू दिले जातात. जेणेकरून त्यांच्या मार्केटचा विस्तार व्हावा…
या प्रक्रियेत आपोआप छोटे निर्माते, प्रयोगशील लेखक व दिग्दर्शक एकतर त्यांच्या वाळचणीला येतात. माण्डलिकत्व न स्वीकारल्यास प्रवाहाबाहेर फेकले जातात.
‘सैराट’ या चित्रपटाची कथा ही सर्व लोकांच्या मनात नॉस्टॅल्जीक बनवणारी पौगंडावस्थेतील हुकमी प्रेमकहाणी आहे.

Boy meets girl…
Boy gets girl…
Boy loses girl…
हा पौगंडावस्थेतल्या शोकांत प्रेमकहाणीचा formula
Boy meets girl…
Boy loses girl…
Boy gets girl…
हा पौगंडावस्थेतील सुखान्त प्रेमकहाणीचा formula

या formula त शोकांतिका निर्माण करण्यासाठी वेगवेगळे combinations वापरता येतात..

उत्तर-दक्षिण संस्कृति!
श्रीमंत-गरीब वर्गसंघर्ष!
काळे-गोरे वर्णभेद!
वैगरे वैगरे…

हा फॉर्मूला इतका वापरला जाउनही मार्केटमध्ये चालतो कारण माणसाचं अबोध मन पहिल्या प्रेमावर कायम लुब्ध राहातं.
कॉर्पोरेट सिनेनिर्मात्यासाठी हेच तयार मार्केट असतं.
पण त्याच वेळी कॉर्पोरेट निर्माते नवीन मार्केटची पॉकेटस शोधतात.

नागराज मंजुळे हा कष्टाने वर आलेला ब्राण्ड आहे. त्याला घेऊन

चित्रपटाच्या फॉर्मूल्यात गरीब-श्रीमंत ऐवजी जात वापरली. चित्रपट तरल वाटेल पण मांसल बनेल याच्यावर नजर ठेवली की, नवा ग्राहक तयार होतो.
हजारो वर्षं गावकुसाबाहेर होते,
ते कॉर्पोर्टेसचं नवीन मार्केट बनतात हे मार्केटिंगचं संशोधन…

याचा ना आंबेडकरवादाशी संबंध असतो ना आधुनिक प्रयोगशील चित्रपटाशी….

पण निर्माण होणारी प्रत्येक controversy ही जायंट corporates चं मार्केट वाढवते.
नि एकांडया प्रयोगशील कलवंताला स्थितिवादाविरुद्ध बंड करण्याअगोदर मार्केटबाहेर फेकुन देते…

‘सामना’ व ‘कोर्ट’ सारखे चित्रपट जी जागा निर्माण करू इच्छित होते ती जागा आता कॉर्पोरेटजायंटनी हेरून बदलाविरुद्धच्या स्थितिवादासाठी व्याप्त केली आहे…

बाकी साऱ्या controversies या सिंथेटिक व मायावी व ब्रांड मार्केटिंग आहेत…No Ideology!

“सामना” व “कोर्ट” परत बघा नि मग “सैराट” बघा!
माझा कॉरपोरेट्स, रंजनात्मक सिनेमाला विरोध नाही. जसा Fast food ला नाही.
पण चविष्ट Fast food हे पौष्टीक आहार म्हणुन खाण्याबाबत मी धोक्याची घंटा वाजवतोय…

शिवाय समाजात सर्वच मार्केट नसतात. त्यांना आवाज देतोय…
यात कणभरही व्यक्तिगत काही नाही…
अजुन खुप आहे ते नंतर कधीतरी….

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

6 Responses to सैराटच्या निमित्ताने

 1. अविनाश गवली says:

  माणसाचं अबोध मन पहिल्या प्रेमावर कायम लुब्ध राहातं. जाम आवडल !!!

  जो काही 50-62कोटि चा गल्ला झालाय तो आता स्थिरावेल असा दिसतय. 100 चा आकडा गाटावा अशी इच्छा !

  मारुति कांबले हा त्या कटप्पा आनी बाहुबली पेक्षा कितीतरी पटीने ‘गहन’होता /आहे – हे कलनार कधी आनी कोनाला ???

 2. jayant says:

  राजू परुळेकर,
  छान लिहिलंय

 3. बाळकृष्ण भोसले, पुणे says:

  अगदी अचूक भाष्य , धन्यवाद

 4. Sunila says:

  Wonderful. ..as always. …Sairat naveen nahi ….Bhoongat…Sairat….Fandry….Wadal…ashi nawach marketing kartat ardha…but saw the interview of Nagraj Manjule on Katta….he is a deep personality with certain things that need to be tapped more ….these things which, he, as a person experienced and showcased it in small things in the movie need to be highlighted more than the story….

 5. Balu Arekar says:

  राजीव जी नमस्कार
  अगदी गहन शब्दात योग्य भाष्य! खर तर धोक्याची घंटा जास्तीत जास्त लोकांना कळावी
  मन:पुर्वक धन्यवाद

 6. Nishant Awale says:

  Sir I could only express my gratitude for your writing. May i know in which sequence I should start reading your write ups which would help me understand you inside out?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s