Category Archives: Uncategorized

||जातधर्म आणि ईसी टीव्ही||

||जातधर्म आणि ईसी टीव्ही|| मला आठवतं तेव्हापासून आमच्या घरात जात आणि धर्माबद्दल कुणीच काही बोलल्याचं मला आठवत नाही. माझी आई २००६ मध्ये गेली. ती खूप धार्मिक स्त्री होती.पण तिने किंवा माझ्या वडिलांनी मला आजतागायत स्वजात व स्वधर्म असं काही सांगितलेलं … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

खरा तो एकची

काणे गुरुजी वर्गात मन लावून गात होते… “खरा तो एकची धर्म…” अचानक बाळु गोखले उठला आणि म्हणाला, “गुरुजी, हे गाणं यापुढे वर्गात चालणार नाही!” काणे गुरुजी हबकले.त्या हबकल्या स्वरात ते म्हणाले, “बाळ,विद्यार्थ्यांनी असं बोलू नये!” बाळु गोखलेच्या कानाच्या खालची शिर … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

अभ्यासक्रम

सकाळ झाली.हैबती उठला. पेट्रोल पिऊन कामाला लागला. ढवळ्या,पवळ्यानां दोन हजारांच्या नोटा त्याने चरायला घातल्या. मग शेत विकून आलेले डॉलर्स मोजू लागला. तीनशे डॉलर्स हिशेबात कमी पडू लागले. हैबतीने आपली पत्नी सीता हिला हाक मारली. ती चहा घेऊन धावतच आली. हैबती … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

राझी

‘राझी’ चित्रपट पाहिला. एकदा बघितला तर नुकसान,फायदा काहीच नाही.न पाहिल्यास अजिबात नुकसान नाही.गाणी बरी आहेत… कारण पुढे तुमचं वय झालं की Nostalgic होण्यासाठी उपयुक्त! बाकी “वतन के लिए” तर आता बलात्कारही होऊ लागलेत! त्यामुळे वतन वैगरे प्रचार ऐकला की अंगावर … Continue reading

Posted in Uncategorized | 1 Comment

डायना

लिंक नसलेल्या गोष्टी 4 ———————————— ज्या काळात समाजमाध्यमे नव्हती, मोबाईल फोन नव्हते, तुरळक लँड लाईन फोन होते.. मुलं-मुली तेव्हाही प्रेमात पडत असत… मी शाळेत असताना असाच एक प्रसंग। घडला… एक मुलगी वर्गात माझ्याकडे सतत वळून बघत असे. अर्थात तेव्हाही मी … Continue reading

Posted in Uncategorized | 3 Comments

प्रिया…

​प्रिया तेंडुलकर©                ********** माझ्या आयुष्यात मी जगू नये अश्यासाठी लाख कारणं होती त्या काळात मी जगावं यासाठी एक कारण भिंतीसारखं उभं राहिलं ते होतं – प्रिया तेंडुलकर…तिच्यावर मी स्वतंत्र लिहिलय नि लिहितोय त्यात … Continue reading

Posted in Uncategorized | 1 Comment

#लिंकनसलेल्यागोष्टी ३ © ********** नववीत असताना मी एका मुलीच्या प्रेमात पडलो. ती प्रचंड बुद्धिमान होती. निदान तेव्हा मला असं वाटायचं… तिचे घरचे फार टापटीप ब्राह्मण… मी पूर्ण गबाळा स्वतःचाच हरवलेला पत्ता शोधत असल्यासारखा… आयुष्यभर दोन गुण माझ्यात कायम होते. १- … Continue reading

Posted in Uncategorized | 2 Comments