अभ्यासक्रम


सकाळ झाली.हैबती उठला. पेट्रोल पिऊन कामाला लागला.
ढवळ्या,पवळ्यानां दोन हजारांच्या नोटा त्याने चरायला घातल्या. मग शेत विकून आलेले डॉलर्स मोजू लागला. तीनशे डॉलर्स हिशेबात कमी पडू लागले. हैबतीने आपली पत्नी सीता हिला हाक मारली. ती चहा घेऊन धावतच आली.

हैबती म्हणाला,”मला चहा नको. आज जर चंगळ म्हणून पेट्रोल प्यायलोय.” मग हैबतीने तीनशे डॉलर्सचा हिशेब सीतेला विचारला. सीता म्हणाली,” तीनशे डॉलर्स मीच वापरले.काल मुलं म्हणाली पेट्रोल प्यायचंय…” हैबतीने एक सुस्कारा सोडला आणि जनावरांना चरायला एटीएम मध्ये न्यायला निघाला. शेजारच्या अन्वरचाचाचा कालच ‘मॉब लिंचिंग’मध्ये वध झाला होता म्हणून रस्त्याने जाताना हैबती त्यांच्या घरात डोकावला तर पोलीस पहाऱ्यात अन्वरचाचाची फॅमिली गायीची स्तोत्रे मोठ्याने गात होती. हैबतीने मोठ्या आवाजात त्या सर्वांचे सांत्वन केले. सुरक्षा रक्षकांनी चमकून हैबतीकडे पाहिले!

इथे अधिक थांबण्यात अर्थ नाही म्हणून हैबती निघाला आणि साधुवाणी प्रवचन केंद्रात येऊन बसला. प्रवचन जहाज बुडण्यापर्यंत येऊन ठेपली होती…
त्या रात्री हैबती पाठयपुस्तकातून व अभ्यासक्रमातून गायब झाला!
बाकी शोध चालू आहे!

About Raju Parulekar

I am original, everything else is copied.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a comment